मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ''बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव'' संपन्न;

CD

नवी मुंबई विमानतळावर आपत्ती सज्जतेची कसोटी
एनडीएमए-जिल्हा प्रशासनाचा संयुक्त सराव
सकाळ वृत्तसेवा
रायगड, ता. १० : कोणत्याही नैसर्गिक किंवा तांत्रिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ किती सज्ज आहे, याचे मूल्यमापन करण्यासाठी दोन दिवसीय बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव नुकताच यशस्वीरित्या पार पडला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सरावात विविध यंत्रणांनी आपला सहभाग नोंदवून आपत्कालीन सज्जतेचे दर्शन घडविले.
विमानतळ परिसरात आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात टेबलटॉप सराव या सत्राने झाली, यामध्ये आपत्तीच्या वेळी करावयाचे नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणारी अत्याधुनिक साधने आणि विशेष वाहनांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. दिनेशकुमार अस्वाल आणि मेजर जनरल अजय वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मोहिमेत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, एनडाईरएफ, सशस्त्र दले, सीआरपीएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अणुऊर्जा विभाग यांतील अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या यशस्वी कार्यक्रमात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जवळे, एनडईएमएचे सदस्य डॉ. दिनेशकुमार अस्वाल, मेजर जनरल अजय वर्मा, मुख्य सल्लागार डॉ. विनोद कौशिक, अणुऊर्जा विभागाचे सदस्य सचिव सरस सेठ, मंत्रालय नियंत्रण कक्ष उपसचिव दत्तात्रय कदम, कोकण विभागीय माहिती प्र.उपसंचालक मनोज सानप, पनवेल उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भामरे, पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी आदी मान्यवरांचा समावेश होता.

चक्रीवादळ, किरणोत्सर्गी गळतीचा यशस्वी मुकाबला
या सरावासाठी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि मल्टी-हॅजार्ड परिस्थिती निर्माण करण्यात आली होती, यामध्ये चक्रीवादळ, आगीच्या घटना आणि धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थांची गळती अशा आव्हानांचा समावेश होता. या परिस्थितीत धोक्यांचे नियंत्रण करणे, आगीपासून बचाव, बहुमजली इमारतींमधून नागरिकांचे स्थलांतर करणे, संवाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे, संसाधनांची जुळवाजुळव आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील सुरक्षा सुनिश्चित करणे, यांसारख्या कार्यपद्धतींची कठोर चाचणी घेण्यात आली. या सरावादरम्यान तातडीचे वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी कळंबोली येथील व्हाईट लोटस हॉस्पिटल, वाशीचे फोर्टिस हॉस्पिटल आणि सीबीडी बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलची पथके तैनात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT