मुंबई

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता

CD

तुर्भे, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या रक्तपेढीत सध्या गंभीर रक्ततुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांच्या उपचारांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. विशेषतः अपघात, कर्करोग, थॅलेसेमिया व प्रसूतीसारख्या अत्यावश्यक उपचारांसाठी लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा अपुरा पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्तपेढीत काही रक्तगटांचा साठा कमी होत आल्याची माहिती समोर आली आहे. ‘ओ’ पॉझिटिव्हसारख्या महत्त्वाच्या रक्तगटाचाही तुटवडा जाणवत असून, गरज पडल्यास नातेवाइकांनाच रक्तदाते शोधावे लागत आहेत. सुट्ट्यांचा कालावधी, महाविद्यालये बंद असणे आणि रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्तसंकलनात मोठी घट झाली आहे. परिणामी, शस्त्रक्रिया व तातडीच्या उपचारांदरम्यान रक्त उपलब्ध करून देताना वैद्यकीय यंत्रणेस अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती खासगी रुग्णालयांतही पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी रक्तदाते विनोद खराटकर यांना तातडीने रक्तदान करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी त्वरित रक्तदान केले.

दरम्यान, शहरात एकूणच रक्तसाठा मर्यादित असल्याने काही रक्तपेढ्यांमध्ये फक्त काही दिवस पुरेल इतकाच साठा उरल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पालिका प्रशासनाने नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांना पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT