मुंबई

खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे सूत्रधार उबाठाचे नेते

CD

फुटीचे सूत्रधार ठाकरे गटाचे नेतेच
खोट्या बातम्या पसरवत असल्याचा खासदार म्हस्के यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेला दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळलेल्या नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते-खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत असल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी केला.

ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचे वृत्त म्हस्के यांनी फेटाळून लावले. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केले तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे, असे म्हस्के म्हणाले. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्या निराधार आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झाली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केल्याचे म्हस्के म्हणाले.

ठाकरेंच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत ठाकरे मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, असा दावा म्हस्के यांनी केला. पक्षातील नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या ठाकरे गटाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत, असे म्हस्के म्हणाले. त्याचा खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. राऊतांच्या कटकारस्थानामुळेच ठाकरे पक्ष मृतावस्थेत गेलाय, अशी टीकाही म्हस्के यांनी केली.
………….
आदित्य-राऊत यांच्यात शीतयुद्ध
आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील, तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे, असे ते म्हणाले.
-------------------------
हितशत्रूच बातम्या पसरवत आहेत
खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत. म्हणून त्यांना वारंवार अग्निपरीक्षा द्यावी लागतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT