मुंबई

बांधकाम मंजुरीसाठी एआय प्रणाली

CD

बांधकाम मंजुरीसाठी एआय प्रणाली

अश्विनी भिडे यांचे प्रतिपादन; स्थावर मालमत्ता क्षेत्राला बूस्टर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई महापालिका शहरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंजुरीला गती देण्यासाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सुविधा सुरू करणार आहे. व्यवसाय सुलभता वाढवणे आणि प्रकल्प मंजुरीतील विलंब कमी करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे.

नारेडको महाराष्ट्रच्या ‘चेंज ऑफ गार्ड’ कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करताना पालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, हे एआयआधारित प्लॅटफॉर्म अनेक नागरी मंजुरी प्रणालींना एकाच डिजिटल इंटरफेसमध्ये एकत्रित करेल. ‘या एआय-आधारित सुविधेची सुरुवात प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी करणे आणि संबंधित घटकांसाठी कार्यक्षमता सुधारणे, हे आमचे ध्येय आहे,’ असे त्या म्हणाल्या.

प्रस्तावित प्रणालीमुळे विकसक, वास्तुविशारद आणि सल्लागारांना रिअल-टाइममध्ये अर्ज सादर करणे आणि त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल, तर कागदपत्रांची पडताळणी आणि विश्लेषणासाठी एआय साधनांचा वापर केला जाईल, असेही पालिका आयुक्त भिडे म्हणाल्या. विकास नियंत्रण नियमांचे पालन सुनिश्चित करेल. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल, असेही त्या म्हणाल्या.
----
डिजिटायझेशनमुळे प्रक्रिया गतिमान
संपूर्ण डिजिटायझेशनमुळे बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आधीच ४५ दिवसांच्या आत पूर्ण होत आहे. महापालिका अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी प्रणालीच्या दिशेने काम करत आहे, असे महापौर रितू तावडे या वेळी स्पष्ट केले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT