मुंबई

आरटीईच्या पहिल्या यादीत १,०५,२२९ जणांची निवड

CD

आरटीईच्या पहिल्या यादीत १,०५,२२९ जणांची निवड
८६ हजार प्रतीक्षा यादीत

मुंबई, ता. १० ः शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनांच्या विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव ठेवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेशासाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. यात २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेशासाठी ८,७०१ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १,१४,८२६ जागांसाठी सर्वसाधारण यादीतून १,०५,२२९ आणि दिव्यांग संवर्गातून ५८२ विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध शाळांमधील प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतीक्षा यादीत तब्बल सर्वसाधारणमधून ८६ हजार ४ आणि दिव्यांगमधून ३० बालकांची निवड झाली असल्याची माहिती आज प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
आरटीईच्या प्रवेशासाठी निवड झालेल्या मुलांचे प्रवेश शनिवार ११ एप्रिलपासून ते सोमवार २० एप्रिल या कालावधीमध्ये संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेणे आवश्यक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. आरटीईच्या या प्रवेश यादीत निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेल्या मोबाईलवर एनआयसीकडून एसएमएस पाठवले जात आहेत. ज्या पालकांना ते आले नाहीत, त्यांनी शासनाच्या आरटीई प्रवेशासाठी असलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन सोडतीत निवड झाली आहे की नाही याची तपासणी करावी, असे आवाहन संचालक गोसावी यांनी केले आहे.
...
कागदपत्रांची पडताळणी
आरटीईच्या प्रवेशासाठीची सोडत ६ एप्रिलला करण्यात आली होती. त्यानंतर ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी येथे जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी पडताळणी समितीमार्फत करावी. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रत देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT