मुंबई

अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराकडून तरुणाला फरपट; घटना सीसीटीव्हीत कैद !

CD

अपघातात दुचाकीस्वार जखमी
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) ः अंबरनाथ पूर्वेतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी दुपारी १ धक्कादायक घटना घडली. एका दुचाकीस्वाराने तरुणाला काही अंतर फरपटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्रचित डुबे हा डोंबिवलीतील जोंधळे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा तरुण दुपारी आपल्या घराजवळील पार्किंगमधून दुचाकी बाहेर काढत होता. त्या वेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. हा अपघात लक्ष नसल्यामुळे झाल्याचे प्रचितने सांगितले; मात्र, संबंधित दुचाकीस्वाराने उलट त्याच्यावर शिवीगाळ करत वाद घातला असता प्रचितने दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या चालकाने त्याला मडगार्डला धरून फरपटत नेल्याचा आरोप प्रचितने केला आहे. या घटनेत प्रचितसह दुचाकीवरील दोघे जखमी झाले. तसेच रस्ता ओलांडणाऱ्या एका फळविक्रेत्यालाही दुखापत झाली. पुढे संबंधित दुचाकीने एका रिक्षालाही धडक दिल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. यामध्ये प्रचित किरकोळ जखमी झाल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद झाल्याचा आरोप प्रचितने केला आहे. “माझा जीव गेला असता, तर जबाबदारी कुणी घेतली असती,” असा सवाल करत त्याने संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT