अनाथ पुतणींना देहविक्रीत ढकलले
काका-काकीला २० वर्षांचा सश्रम कारावास
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : आई-वडील नसल्याने काकांकडे आश्रयासाठी आलेल्या दोन अनाथ पुतणींना जबरदस्तीने डान्स बार आणि देहविक्रीच्या जाळ्यात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बेलापूरमध्ये उघडकीस आला आहे. या घटनेतील आरोपी काका-काकीला बेलापूर न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३३ हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही मुलींकडून वेश्याव्यवसाय करून त्यांच्या कमाईवर हे दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
राजेश सोनाजी शिंदे आणि शुभांगी राजेश शिंदे अशी अटकेतील दाम्पत्याची नावे आहेत. आरोपी राजेश याचा भाऊ व वहिनीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन्ही मुली राजेश शिंदे याच्याकडे आश्रयासाठी आल्या होत्या. मात्र या दाम्पत्याने मोठ्या पुतणीला जबरदस्तीने बारमध्ये काम करण्यास आणि देहविक्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर २०१७ मध्ये १७ वर्षीय अल्पयवीन पुतणीचे वय लपवण्यासाठी तिचे बनावट आधार कार्ड तयार केले.
पीडिता अल्पवयीन असतानाही तिला १८ वर्षांहून अधिक वयाचे दाखवून एका डान्स बारमध्ये नाचायला लावले. बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिला प्रवृत्त केले. त्या वेळी मोठ्या बहिणीने यातून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रकार उघड केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करीत बारमधून अल्पवयीन मुलीची सुटका केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. १०) न्या. मांडवगडे यांनी या दम्पत्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.