वसईच्या शिक्षिकेचा अपघातात मृत्यू
विरार, ता. ११ (बातमीदार) ः वसईतील शिक्षिका बसची वाट बघत उभी असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
वसई पूर्वेतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या स्वीडन गोम्स (४०) या शनिवारी शाळेत जाण्यासाठी आपल्या घरातून निघाल्या होत्या. पुढील प्रवासासाठी त्या मार्गावरून शाळेकडे जाणारी बस, रिक्षा किंवा इतर वाहन मिळवण्यासाठी वज्रेश्वरी रस्त्याकडे पायी जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गोम्स यांना मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या व जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अपघातातील ट्रकचालक फरार असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.