मुंबई

महापालिका खरेदी करणार २२ पाण्याचे टँकर

CD

महापालिका खरेदी करणार २२ पाण्याचे टँकर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शहरात पाणीटंचाईची समस्या आहे अशा भागांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत पाण्याच्या टँकरची संख्या कमी असल्याने सोसायटीतील रहिवाशांना वेळेवर महापालिकेचे टँकर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मुंबईकर नगरसेवकांकडे करीत आहेत. या वाढत्या तक्रारी लक्षात घेता मुंबईतील पाणीपुरवठा वाढविण्यासाठी पालिकेने वाॅटर टँकर वाढवावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आता २२ नवीन वाॅटर टँकर खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये दैनंदिन कामासाठी तसेच मुख्य जलवाहिनी दुरुस्ती, दूषित तसेच अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक उत्सव, निवडणूक कार्यक्रम, विविध सरकारी कार्यक्रम, आपत्कालीन परिस्थिती अशाप्रसंगी जलवाहकांची सेवा पुरविण्याची मागणी जल अभियंता विभागाद्वारे आणि पालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमार्फत केली जाते. मात्र सद्य:स्थितीत कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा उपविभागात ३७ पाण्याचे टँकर्स असून, यांच्यामार्फत शहर, पश्चिम व पूर्व उपनगरे येथील विविध विभागांना पाणी पुरविण्यात येते, अशावेळी पाण्याच्या टँकर्सअभावी अनेक विभागांत पालिकेला पाणीपुरवठा करण्यास मोठा अडथळा येतो. यासाठी महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT