मुंबई

ठाण्यात ‘मुक्या जीवां’साठी धावून येणारे हात

CD

ठाण्यात ‘मुक्या जीवां’साठी धावून येणारे हात
तीन महिन्यांत १०० पशु-प्राण्यांना मिळाले जीवनदान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच मुक्या जीवांचीही तितक्याच तत्परतेने काळजी घेतली जात असल्याचे चित्र ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कार्यातून स्पष्ट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत विविध संकटात अडकलेल्या सुमारे १०० पशुपक्ष्यांसह प्राण्यांना जीवनदान देण्यात कक्षाला यश आले आहे. यावरून सरासरी दररोज एखाद्या तरी मुक्या जीवाची सुटका करण्यात येत आहे.
दररोज आपत्ती व्यवस्थापन कक्षेचा फोन खणखणीत असून, साहेब श्वान विहिरीत पडलेले, इमारतींच्या सज्जावर मांजर अडकलेले, झाडांमध्ये किंवा वायरमध्ये कबुतर किंवा कावळा अडकलेला आहे. या माहितीनंतर कक्षाच्या तत्काळ प्रतिसादामुळे अनेक जीव मृत्यूच्या दारातून परत आले आहेत.
आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये ४५, फेब्रुवारीत २५ तर मार्चमध्ये २७ अशा एकूण ९७ पशुपक्ष्यांसह प्राण्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ८७ जीव वाचवण्यात आले होते. त्यामुळे यंदा ही संख्या १० ने वाढल्याचे दिसून येत आहे. तर, सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये मांजरी (वाघाची मावशी), श्वान, गाय, बैल यांचा समावेश असून, पक्ष्यांमध्ये कावळा, कबुतर, घुबड, पोपट आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या या कार्यामुळे शहरात मानवतेसोबतच प्राणीमात्रांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित होत आहे.

ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात येणारा प्रत्येक कॉल हा केवळ मानवी आपत्तीपुरताच मर्यादित नसून, तो अनेकदा मुक्या प्राण्यांशी संबंधितही असतो. अशा प्रत्येक कॉलला तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देण्यात येतो. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत सुमारे १०० जीवांना वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे.
- यासीन एम. तडवी
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठामपा

असे वाचवले जीव
२०२६ २०२५
महिना पक्षी प्राणी पक्षी प्राणी
जानेवारी ३१ १४ १४ २६
फेब्रुवारी १२ १३ १९ ०९
मार्च १४ १३ ०४ १५
एकूण ५७ ४० ३७ ५०
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शेतात लागलेल्या आगीत सालदाराचा संसार जळून खाक, तळवेल फाट्या जवळील घटना

SCROLL FOR NEXT