मुंबई

सेस निधीतून पालघरमध्ये कृषी विकासाला चालना

CD

सेस निधीतून पालघरमध्ये कृषी विकासाला चालना
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी

पालघर, ता. १२ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघरच्या कृषी विभागामार्फत सेस निधीअंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी विविध कृषी योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी योजनांची सविस्तर माहिती दिली. पीक संरक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग तसेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अशा विविध घटकांचा योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके खरेदीवर ५० टक्के अनुदान उपलब्ध राहणार आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी लाइट ट्रॅप, स्टिकी ट्रॅप व फेरोमेन ट्रॅप यांनाही सहाय्य मिळणार असून, विविध प्रकारचे स्प्रे पंप खरेदीसाठीही अनुदानाची सुविधा देण्यात येत आहे.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनी संयंत्र, तार कम्पाउंड तसेच स्थानिक साधनसामग्रीच्या सहाय्याने कुंपण उभारणीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. शेती यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी मळणी यंत्र, गवत कापणी यंत्र, पॉवर विडर, रोटावेटर, बियाणे पेरणी यंत्र, चेन सॉ, पॉवर रिपर आदी अवजारांवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. सिंचन सुविधांच्या दृष्टीने डिझेल व विद्युत पंप, सौर पंप तसेच पाइप खरेदीसाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः सौर पंपासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ या तत्त्वावर आधारित प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गतही लाभ दिला जाणार आहे.

बियाणे पुरवठा योजनेअंतर्गत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी संकरित व सुधारित बियाणे ५० टक्के अनुदानाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत, तर भाजीपाला मिनीकिटसाठी ७५ टक्के अनुदानाचा लाभ मिळेल. फुलशेती (मोगरा, सोनचाफा) व रेशीम उद्योगासाठीही आर्थिक सहाय्य उपलब्ध करूनदेखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतीस पूरक सुविधा म्हणून नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण तसेच बायोगॅस प्रकल्पांसाठी आर्थिक मदत उपलब्ध आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सोलर ड्रायरसारख्या उपकरणांवर ८० टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवामृत, गांडूळ खत प्रकल्प, प्रमाणीकरण खर्च, प्रशिक्षण व अभ्यास दौरे यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय बांबू लागवड, मधुमक्षिका पालन, मशरूम लागवड, मसालावर्गीय पिके, पानवेल/नागवेल लागवड तसेच वेलवर्गीय भाजीपाला लागवड यांसाठीही सहाय्य उपलब्ध आहे.
--------------------------
आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी प्रिसिजन फार्मिंग

आधारित सेन्सर तंत्रज्ञान, फळपिकांसाठी आधुनिक साधने तसेच मधुमक्षिका पालन व भाजीपाला विक्रीसाठी साहित्य पुरवठा अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश आहे. शेतकरी उत्पादक गट, बचत गट व महिला गटांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. दिव्यांग शेतकऱ्यांना उत्पन्नाची अट न ठेवता ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद असून, अनुसूचित जाती-जमातीतील तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व योजना डीबीटी तत्त्वावर राबविल्या जाणार आहेत. या योजनांमुळे शेती अधिक आधुनिक, उत्पादनक्षम आणि शाश्वत होण्यास मदत होईल, असा विश्वास मनोज रानडे यांनी व्यक्त केला. पात्र शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी व विस्तार यंत्रणेशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोमनाथ पिंजारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शेतात लागलेल्या आगीत सालदाराचा संसार जळून खाक, तळवेल फाट्या जवळील घटना

SCROLL FOR NEXT