SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

Jofra Archer on Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२६ एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून देण्यात वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर यांचा मोठा वाटा राहिला. या सामन्यानंतर जोफ्रा आर्चरने वैभवला नेट्समध्ये गोलंदाजी करण्याबाबत प्रतिक्रिया दिली.
Jofra Archer on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026

Jofra Archer on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमयर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात बुधवारी (२७ मे) १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने दमदार कामगिरी केली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला (RR beat SRH) ४७ धावांनी पराभूत केले. राजस्थानच्या या विजयात वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांनी मोलाचा वाटा उचलला. यानंतर आर्चरने वैभवबाबत मोठे भाष्य केले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने २१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकात ८ बाद २४३ धावा केल्या. हैदराबादकडून प्रफुल हिंगेने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Jofra Archer on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026
SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com