मुंबई

पाणी , रस्ते कामाला पालिकेने गती द्यावी

CD

पायाभूत सुविधांना पालिकेने गती द्यावी
स्थानिकांची महापालिकेकडे मागणी

वसई, ता. १२ (बातमीदार) : नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण पालिकेकडून व्हावे, तसेच पाणी, रस्ते कामाला गती देण्यात यावी, यासाठी वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या दालनात भेट देऊन नागरिकांनी हे प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या वेळी लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे शिष्टमंडळाला महापौर व उपमहापौरांच्या वतीने आश्वासित करण्यात आले.
वसई-विरार शहरात ‘अमृत २:०’ चे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नाही. तसेच ग्रामीण भागातील बऱ्याच मुख्य व गावा अंतर्गत रस्त्याचे काम रखडले आहे. त्याला गती द्यावी व ते पूर्ण झाल्यावरच नवीन काम सुरू करावे. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या जाणून घेतल्या. तसेच उपमहापौर मार्शल लोपीस यांनी बाजार विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांना बाजार वेळेत योग्य बदल करण्याचे निर्देश दिले. या वेळी बहुजन विकास आघाडीचे रॉनल्ड रोमन गोम्स, रिटा काळे, स्टीवन रॉड्रीग्ज, ऑल्सन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

------------
नालासोपारा येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन केले जाते व हा शेतमाल सोपारा येथे विक्रीसाठी नेला जातो. येथील बाजाराच्या वेळेत बदल करून, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागेची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT