प्रकल्प मोबदलासंदर्भात बैठक घ्यावी
खुडेद क्षेेत्रातील शेतकरी व कुटुंबीयांची अधिकाऱ्यांकडे मागणी
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : या महिन्यातल्या तिसऱ्या शुक्रवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता प्रकल्प परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित नसणार आहेत. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी प्रकल्प मोबदला संदर्भात बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे.
खुडेद क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व कुटुंबीय यांच्याबाबतचा स्थानिक जमीन संपादन मोबदला, पुनर्वसन, आर्थिक पॅकेजबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी विनंती येथील ग्रामस्थांनी सहाय्यक आयुक्त तसेच उपविभागीय अधिकारी, वाडा यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. या अर्जात ग्रामस्थ म्हणतात की, संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी व संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन सविस्तर माहिती द्यावी. तसेच पुन्हा एकदा ग्रामसभेचे आयोजन करून विविध मुद्यांवर चर्चा करावी, असे त्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.