सामाजिक समता सप्ताह उत्साहात
पालघर, ता. १२ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघर आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह गुरुवारी (ता. ९) जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा अधिकारी अतुल पारसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेची हमी दिली असून, सामाजिक समतेची पायाभरणी करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले, त्यामुळे संविधानातील मूल्यांचे पालन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. यामध्ये संविधान जागर अभियान, नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, ऑनलाइन व्हॅलिडिटी प्रमाणपत्र वितरण, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य व लघुनाटिका सादरीकरण, तसेच संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.