मुंबई

महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची आयुक्तांकडून पाहणी

CD

महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची आयुक्तांकडून पाहणी

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई़-विरार महापालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेल्या तसेच पूर्णत्वाच्या मार्गावर आलेल्या विविध विकासकामांसह प्रकल्पांच्या कामाचा सविस्तर आढावा आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी शनिवारी (ता. ११) घेतला.

या पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग समिती ‘ए’ मधील बोळिंज येथील मलनिस्सारण केंद्र एसटीपी-२ प्लांट येथून करण्यात आली. सदर मलनिस्सारण केंद्राबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आयुक्तांनी संबंधितांना विविध सूचना दिल्या. त्यानंतर विरार पश्चिमेकडे प्रगतिपथावर असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली. खेळाडूंसाठी उपलब्ध सुविधा व क्रीडा विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांची पाहणी करीत, आवश्यक त्या सूचना या वेळी देण्यात आल्या. ‘अमृत २’ योजने अंतर्गत पाणीपुरवठा बळकटीकरण करणे कामी सुरू असलेल्या तुळिंज जीएसआर व बिलालपाडा येथील मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या सुरू असलेल्या विकास कामास आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली.

त्याचप्रमाणे ‘अमृत २’ योजने अंतर्गत सेंट्रल पार्क येथे टाकण्यात येत असलेल्या मलवाहिनीची पाहणी या वेळी करण्यात आली. नालासोपारा येथील कॅपिटल मॉलच्या बाजूला सुरू असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या कामास तसेच मायक्रो ट्यूनलिंगच्या कामासही आयुक्तांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. मजेठीया, नालासोपारा पूर्व येथील पूर्णत्वाच्या टप्प्यात असलेल्या नाट्यगृहाची आयुक्तांनी पाहणी केली व येथील आसन व्यवस्थेचा, विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. नाट्यगृहाला लागूनच असलेल्या वाचनालयालाही आयुक्तांनी भेट देत येथील व्यवस्थेचा आढावा घेतला व उपस्थित विद्यार्थीवर्गाशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर तेथीलच आरोग्य केंद्रालाही भेट देत येथील कामासंबंधी येथील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
==================================
रुग्णालयाच्या जागेची पाहणी
शहरातील नागरिकांना जलद गतीने उत्कृष्ट सेवा सुविधा मिळाव्यात यादृष्टीने महापालिकेचे प्रस्तावित व सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत या भावनेने आयुक्त पृथ्वीराज यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी व भर उन्हात हा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, प्र. शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, प्र. कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे, प्र. कार्यकारी अभियंता अमोल जाधव, उप अभियंता सतीशकुमार सूर्यवंशी, संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त, अभियंते, विभागप्रमुख इतर संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT