मुंबई

महसूल विभागात ५५ तहसीलदारांची पदोन्नती

CD

वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : महाराष्ट्राच्या प्रशासनाला अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील तब्बल ५५ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील तहसीलदारांचाही समावेश आहे.
महसूल विभागावर शेतकऱ्यांचे जमिनीचे हक्क, ७/१२ उतारे, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढविणे ही काळाची गरज मानली जात होती. मागील वर्षीच या पदोन्नतीसंदर्भात निर्णय घेण्यात आला होता; मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे त्याची अंमलबजावणी रखडली होती. अखेर ठाम भूमिका घेत हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यात आला आहे. महसूल खात्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पदोन्नती देण्याची घटना दुर्मिळ मानली जात आहे.
या पदोन्नतीमुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. परिणामी प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयक्षम व जनहितवादी नेतृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT