मुंबई

मुरूडमध्ये महसूल समाधान शिबिर

CD

मुरूडमध्ये महसूल समाधान शिबिर
११६२ लाभार्थ्यांना तत्काळ सेवा
मुरूड, ता. १२ (बातमीदार) : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत टप्पा क्र. १ मध्ये बोर्ली मंडळातील मौजे वळके येथील हनुमान मंदिरात शुक्रवारी (ता. १०) शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरापूर्वी मंडळातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. शिबिरादरम्यान विविध शासकीय सेवांसाठी अर्ज स्वीकारून अनेक सेवा तत्काळ देण्यात आल्या. यात उत्पन्न दाखले (१६१), वय व अधिवास प्रमाणपत्रे (४३), जात दाखले (२६), डिजिटल सातबारा (४६९), डिजिटल ८-अ उतारे (११८), रेशन कार्ड (२८), आधार अपडेट (१२), संजय गांधी निराधार योजना नोंदणी (१२) अशा सेवांचा समावेश होता. तसेच निवडणूक विभागांतर्गत नवीन मतदार नोंदणी (५८), नाव वगळणे (१६), दुरुस्ती/स्थलांतर (९०) अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय विविध दाखल्यांसाठी अतिरिक्त अर्जही घेण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या ज्योती नागावकर, सरपंच प्रिया म्हात्रे, उपसरपंच परेश चवरकर, विजय घाणेकर, सामाजिक कार्यकर्ते भगीरथ पाटील, शरद पाटील व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार आदेश डफळ यांनी शासन निर्णय (१८ फेब्रुवारी २०२६) अंतर्गत योजनांची माहिती देत पुढील शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी १० एप्रिल निमित्त राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करून उपअधीक्षक काळे यांनी त्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले.

चौकट
पुढील टप्पा
शुक्रवारी (ता. १७ एप्रिल) उसरोली येथे पुढील समाधान शिबिर होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur: अक्कलकोटमध्ये सातवीच्या मुलीवर शाळेत अत्याचार, २३ वर्षीय तरुणाला अटक; ब्लॅकमेलला कंटाळून तिच्या बालविवाहाचा प्रयत्न

उन्हात नको, सावलीत बसा! विखे पाटलांची जरांगेंना विनंती; म्हणाले, सातारा गॅझेटचं अवघड आहे

Latest Marathi Update Live: पुण्यात विषारी दारू मृत्यु प्रकरणी युवक काँग्रेसच आंदोलन

11th Admission: अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांचे हाल, महाविद्यालयात प्रवेश देण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT