मुंबई

भिवंडी पालिकेच्या ५० शाळा डिजिटल होणार

CD

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा मोठा टप्पा गाठला जाणार आहे. एकूण ९७ शाळांपैकी ५० शाळा लवकरच डिजिटल होणार आहेत. सरकारच्या उपक्रमांतर्गत काही दिवसांपूर्वी संगणक लॅब उभारण्यासाठी आवश्यक साहित्य शाळांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
महापालिकेच्या एकूण ९७ शाळांमध्ये ११ माध्यमिक आणि ८६ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांचे टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करण्यात येणार आहे. सध्या ५० शाळांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे. यात प्रत्येकी १० संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि एलईडी पॅनल यांचा समावेश आहे. या संगणक लॅबमध्ये अद्याप प्रशिक्षकांची नेमणूक झालेली नसली, तरी येत्या शैक्षणिक वर्षापासून (जूनपासून) विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमासह डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. काही शाळांमध्ये ‘स्मार्ट रूम’ उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.
संगणकीकरणामुळे विद्यार्थ्यांना चलत-चित्रांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढून शिक्षण अधिक प्रभावी आणि गतिमान होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही शिक्षणात करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.
डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून ते अधिक जलद आणि प्रभावीपणे ज्ञान आत्मसात करू शकतील, असे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT