भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतक जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात झाली. पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांनी फुले, आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपायुक्त विक्रम दराडे, सपना वसावा, मुख्य लेखा वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे आदी अधिकारी उपस्थित होते. सप्ताहनिमित्त जादूगार महेंद्र सोनवणे यांच्या सौजन्याने संविधानातील विविध कलमांचे छायाचित्र प्रदर्शन घेण्यात आले. या आठवड्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान; तसेच कवयित्री सुरेख पैठणे व डॉ. कैलास गायकवाड यांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.