हिंदुस्तान पेट्रोलियमकडून ३४७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
जव्हार, ता. १२ (बातमीदार) : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी विविध योजना या राज्य तथा केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गोखले एज्युकेशनच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील ३४७ विद्यार्थ्यांना एकूण २८ लाख ८२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती ही गुरुवारी (ता. ९) वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रत्येकी आठ हजार ते १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमासाठी एचपीसीएलचे कार्यकारी संचालक लिबू मॅथ्यू वर्गीज, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) चंद्रकांत पांडे, मुख्य व्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल विशे व डॉ. रवींद्र सोनवणे तसेच उपमहाव्यवस्थापक भरत बर्वे व इंदल कनोजिया यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिष्यवृत्तीमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात गती मिळून आत्मविश्वास वाढेल, असे मत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असे सांगितले. अभ्यासाची खूप आवड होती आणि अगदी वेळेवर हिंदुस्तान पेट्रोलियमकडून शिष्यवृत्ती माझ्या खात्यावर जमा झाल्याने खूप मोठा आर्थिक मिळाला असल्याची माहिती अखेरच्या वर्षास शिक्षण घेत असलेल्या अलका पारधी हिने दिली.
दरम्यान, पात्र व गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत, ही रक्कम पुढील शिक्षणासाठी व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी उपयोगात आणू, अशी भावना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.