मुंबई

माजिवडा जलवाहिनी दुरुस्तीने पाणीपुरवठा विस्कळीत

CD

माजिवडा जलवाहिनी दुरुस्तीने पाणीपुरवठा विस्कळित
२४ तासांच्या शटडाऊननंतरही कमी दाबाने पाणी; नागरिकांना जपून वापराचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : माजिवडा जंक्शन येथील मुख्य जलवाहिनीत झालेल्या मोठ्या गळतीमुळे २४ तासाचे शटडाऊन घेत, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे शनिवारी (ता. ११) सकाळी ९ पासून ते रविवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागल्याने दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी सुमारे ११.४० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, स्टेम प्राधिकरणाचा पुरवठा दुपारनंतर पूर्ववत झाला असल्याची माहिती पालिकेने दिली.
महापालिकेने पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना माजिवडा परिसरात वाहतुकीलाही फटका बसला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ठाणे पालिकेने २४ तासांचा शटडाउन जाहीर केला. तसेच या कालावधीत कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, मानपाडा, ब्रह्मांड, राबोडी, कोपरी, शिवाजीनगर, चरई, कोलबाड, विष्णुनगर, घंटाळी, खोपटसह अनेक भागांना पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

विकतचे पाणी आणण्याची वेळ
अनेक सोसायट्यांमध्ये शनिवारी सकाळनंतरच पाणीपुरवठा खंडित झाल्याने टाक्या कोरड्या पडल्या. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागली. काहींनी विकतचे पाणी आणून दिवस काढला, तर टँकरसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. मात्र, शहरातील मोठा भाग प्रभावित झाल्याने सर्वत्र टँकर पोहोचवणे महापालिकेसाठीही डोकेदुखी ठरले. अनेकांना अंघोळीविनाच दिवसाची सुरुवात करावी लागली. अचानक आलेल्या या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT