आसनगावच्या विद्यार्थिनी बनल्या फॅशन डिझायनर
वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगावमधील स्वाती पाटील बॅचलर ऑफ फॅशन डिझाइन महाविद्यालयात शिकत असलेल्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ नुकताच झाला. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ही प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनवली होती. वाणगावसारख्या ग्रामीण भागात डिझाइन महाविद्यालय उभारून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थिनींना पदवीचे शिक्षण देऊन डिझायनर बनवणे शक्य झाले, याचा मनस्वी आनंद आहे. विद्यार्थिनींना नोकरी व व्यवसाय करताना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल, असे समारंभादरम्यान कार्यकारी संचालक तृप्ती पाटील यांनी सांगितले.
या वेळी अध्यक्ष मिलिंद पाटील, कार्यकारी संचालिका तृती पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संकेत धाराशिवकर, डिझाइन महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. वैष्णवी करपे, सह संस्थेतील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि डिझाइन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिक्षण संस्थेने आम्हाला मोफत सोयीसुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने शिक्षण घेता आले. डिझाइन महाविद्यालयात प्रवेश घेताना हातात पेन्सिल धरणे याचेही ज्ञान नव्हते; परंतु सध्याच्या परिस्थितीत ड्रेस डिझाइनिंग, इलस्ट्रेशन यामधील परिपूर्ण माहिती संपादन करून डिझायनर होता आले. त्याबद्दल संस्थेचे आणि महाविद्यालयाचे ऋणी असल्याचे येथील विद्यार्थिनीने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.