मुंबई

महाराजस्व अभियानात १२०० लाभार्थीना दाखले वाटप

CD

महाराजस्व अभियानात दाखलेवाटप

पालघर (बातमीदार) : जिल्हा महसूल विभागाने बोईसर मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन डॉ. स. डा. वर्तक विद्यालयात केले होते. शिबिरात १,२८३ नागरिकांना सेवा आणि विविध दाखले वितरित करण्यात आले. नागरिकांना एकाच ठिकाणी दाखले आणि तत्सम सरकारी सेवा मिळावी यादृष्टीने हे शिबिर घेण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तसेच प्रलंबित कामे करून नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा देणे या उद्देशाने महाराजस्व समाधान शिबिर राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी शुभारंभ प्रसंगी केले, तर हे अभियान नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असून, त्याचा लाभ नागरिक घेत असल्याचे समाधान उप जिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांनी व्यक्त केले. या वेळी पालघरचे अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, खैरेपाडा, सरावली व बोईसर परिसरातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. शिबिरात नागरिकांना विविध दाखले, जमिनीचे ७/१२ व ८ अ वाटप करण्यात आले. तसेच ७/१२ अद्यावत करणे, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पाणंद रस्ते, अभिलेख दुरुस्ती, अकृषिक मार्गदर्शन, पी.एम. किसान योजना, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन, सामाजिक योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क अंतर्गत तत्काळ सेवा व आरोग्य तपासणी अशा विविध सेवा एक दिवस सेवा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT