मुंबई

व्हीआयपी क्रमांकाकडे नवी मुंबईकरांचा वाढता कल

CD

वाशी, ता. १४ (बातमीदार) : कोरोनानंतरच्या काळात आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात ढासळलेली असली तरी वैयक्तिक सोयीसाठी स्वतःचे वाहन घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल सात हजार १२९ वाहनधारकांनी व्हीआयपी नंबर घेतले असून, यामधून आरटीओला ११ कोटी २१ लाख २३ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या विभागाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी टाळण्याची मानसिकता आणि जीवनशैलीतील बदल यामुळे वाहन खरेदीत वाढ झाली असून, त्याचबरोबर वाहनांसाठी आकर्षक व प्रतिष्ठेचे मानले जाणारे व्हीआयपी (फॅन्सी) क्रमांक घेण्याची क्रेझही वाढताना दिसत आहे. व्हीआयपी क्रमांकासाठी सरकारकडून जादा शुल्क आकारले जात असले, तरीही नागरिकांचा या क्रमांकांकडे असलेला आकर्षण कमी झालेला नाही. उलट, ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून व्हीआयपी क्रमांकांकडे पाहिले जात असल्याने मागणी सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन लिलाव पद्धतीमुळे नंबर मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, इच्छुक वाहनधारक मोठ्या रकमा मोजण्यासही तयार आहेत.

वाहन खरेदीसोबतच व्हीआयपी क्रमांक घेण्याची वाढती आवड ही नवी मुंबईकरांच्या बदलत्या जीवनशैलीचे आणि आर्थिक प्राधान्यांचे प्रतीक मानली जात आहे. भविष्यात ही क्रेझ आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंकशास्त्राचाही आधार
क्रमांक निवडताना अनेक वाहनधारक अंकशास्त्राचा आधार घेत आहेत. अंकांची बेरीज करून येणारा ‘लकी नंबर’, जन्मतारीख, वाढदिवस, किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या तारखा यांचा विचार करून नंबर घेतले जातात. काही जण आधीच्या वाहनाचा क्रमांक शुभ ठरल्याने तोच क्रमांक नव्या वाहनासाठी पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विशिष्ट क्रमांकासाठी स्पर्धा निर्माण होत असून, लिलावात त्यांची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढते.

हौसेला मोल नसते, या उक्तीप्रमाणे नागरिक व्हीआयपी क्रमांकासाठी मोठ्या रकमा खर्च करत आहेत. यामुळे सरकारच्या महसुलात भर पडत आहे. अनेक व्यावसायिक, उद्योजक आणि तरुण वर्गात देखील आकर्षक क्रमांक घेण्याची स्पर्धा दिसून येते. सोशल मीडियावरही अशा क्रमांकाची प्रसिद्धी होत असल्याने त्याचे आकर्षण अधिक वाढले आहे.
- गजानन गावंडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

व्हीआयपी क्रमांकाची किंमत
क्रमांक चारचाकी दुचाकी
१ ४ लाख ५० हजार
९, ९९, ७८६, ९९९, ९९९९ १.५० लाख २० हजार
२, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, ११, २२, ३३, ४४, ५५, ६६, ७७, ८८ ५० हजार १० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT