मुंबई

माथेरानमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

CD

माथेरानमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम
कर्जत, ता. १२ (बातमीदार) : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माथेरान येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीतर्फे हुतात्मा भाई कोतवाल शाळेत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर साहित्य देण्यात आले. महात्मा फुले यांच्या स्त्री-शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन व शेतकरी हक्कांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षण सभापती सुनील शिंदे, नगरसेवक मनोज खेडकर, मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT