मुरूडमध्ये २८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मुरूड, ता. १२ (बातमीदार) : संजीवनी आरोग्यसेवा संस्था, मुरूड व मनोरमा नेत्रालय, मुलुंड (पश्चिम) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत २८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
नुकत्याच घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ५६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यानंतर संस्थेतर्फे मुरूडहून मुलुंड येथे रुग्णांची ने-आण करण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली. शनिवारी (ता. ११) १४ पुरुष आणि १४ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख व मनोरमा नेत्रालयाच्या टीमच्या सहकार्याने पार पडल्या.
या उपक्रमासाठी डॉ. रागिणी पारेख यांनी विशेष परिश्रम घेतले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल संजीवनी संस्थेच्या कार्यकारिणीने मनोरमा नेत्रालयाच्या टीमचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.