मुंबई

नरेंद्र माेदी प्रतिक्रीया

CD

भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवीन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान
-------------------------
आशा भोसलेजी यांच्या निधनाने संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक प्रतिष्ठित गायिका म्हणून त्यांच्या महान कारकिर्दीने भारतातील संगीताचे युग परिभाषित केले आहे. त्यांच्याशी वैयक्तिकरीत्या संवाद साधल्याच्या माझ्या आठवणी आहेत. एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी स्वत:च्या अटींवर आपले जीवन जगले. आपल्या सुमधुर आणि कालातीत आवाजाने त्यांनी अनेक दशके भारतीय संगीत समृद्ध केले. तिचे संगीत चिरंतन जिवंत राहील. त्यांच्या निधनाने संगीतप्रेमींचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
- राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू
-----
आज प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी दुःखद दिवस आहे. कारण आपल्या लाडक्या आशा भोसलेजी आता आपल्यामध्ये नाहीत. आशाताईंनी आपल्या गोड आवाजाने आणि अतुलनीय प्रतिभेने केवळ एक वेगळी ओळख निर्माण केली नाही तर आपल्या सुरांच्या माध्यमातून भारतीय संगीताला आणखी समृद्ध केले. आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आशाजींनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, गुजराती आणि इतर अनेक भाषांमधूनच नव्हे तर लोकगीतांमध्येही आपला अमिट ठसा उमटवला. आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्या कायम आपल्या हृदयात राहतील. ईश्वर आशाजींना त्यांच्या दिव्य चरणी स्थान देवो.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
--------
आशाताई भोसले केवळ एक अद्वितीय गायिका नव्हत्या, तर त्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या जाण्याने आज त्यांच्या अनेक आठवणी दाटून येत आहेत. आशाताईंशी संवाद साधण्याची संधी मला अनेकदा लाभली. कधी प्रत्यक्ष भेटीतून, तर कधी फोनवरील संभाषणातून त्यांचं मोठेपण अनुभवायला मिळालं. गायक म्हणून त्या अष्टपैलू होत्याच; पण माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच ‘ग्रेट’ होत्या. आज त्या आपल्यात नाहीत; पण त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.
- अशाेक चव्‍हाण, खासदार
.......
साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दांत सांगता येणार नाही... माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली... आशाताईंचं अस्तित्व हे आपल्या सर्वांना वर्षानुवर्षे समाधानाची आणि आनंदाची अनुभूती देत राहिलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि प्रवास हा स्वतः दुःख सहन करत इतरांना आनंद देण्याचा एक प्रेरणादायी आदर्श होता. संगीत क्षेत्रातील त्यांचं कर्तृत्व केवळ भारतापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जगाला भुरळ घालणारं ठरलं.
- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
------
महान गायिका आशा भोसलेजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांची कला आपल्यात कायमची अमर राहील. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या शोकाकुल प्रियजनांसोबत आणि चाहत्यांसोबत सहभागी आहे.
- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
..................
आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- शरद पवार, अध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)
----
भारताच्या सूरसम्राज्ञी आशा भोसलेजी यांचे निधन माझ्यासाठी खूप दु:खद आहे. पार्श्वगायिका म्हणून त्यांनी हजारो चित्रपट आणि संगीत अल्बममध्ये आपला आवाज दिला. भारतीयांनी पिढ्यान्‌पिढ्या त्यांची गाणी ऐकली आहेत आणि गुणगुणली आहेत. त्यांच्या मधुर सुरांचा प्रतिध्वनी कायम घुमत राहील. आशा भोसले यांच्या निधनाने संगीत जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
-----
आपल्या अवीट स्वरांनी, विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या क्षमतेने आणि संगीतातील व्यापक योगदानामुळे आशा भाेसले यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य केले. आपल्या जवळपास आठ दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. आशाजींची भावोत्कटता व कलेप्रती बांधिलकी भावी पिढ्यांमधील कलाकार आणि रसिकांना प्रेरणा देत राहील. आशाजींच्या निधनामुळे संगीतविश्वाचे, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. आशाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- जिष्णुदेव वर्मा, राज्यपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT