खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट
माणगाव (वार्ताहर) ः तळा तालुक्यातील आडनाळे येथील एका तरुणाच्या खिशात असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना रविवारी (ता. १२) घडली. या स्फोटात तरुण जखमी झाला आहे.
महेश नाक्ते (वय ३८) हे कामासाठी मुंबईत वास्तव्यास असून रविवारी (ता. १२) एका कार्यक्रमानिमित्त गावी आले होते. ते घरात बसले असता दुपारी १२ ते १२.३०च्या दरम्यान अचानक त्यांनी आपल्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये महेश यांनी घातलेली जीन्स पॅन्टचा पुढील खिसा पूर्णपणे खाक झाला. महेश हे या स्फोटात जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवले असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे.