प्रतिक्रिया
-------
भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी हा अत्यंत दु:खद दिवस आहे. आमच्यासाठी आशाताई कुटुंबासारख्या होत्या. आज आपण अनुभवत असलेला हे दु:ख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. एका क्षणी मन पूर्णपणे शांत होते आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी दिलेल्या असंख्य सुरावटींमध्ये हरवून जाते. जणू काळच थांबला आहे असे वाटते. पण त्यांच्या अमर गाण्यांमुळे त्या सदैव अजरामर राहतील. ताई, आमचे आयुष्य उबदारपणाने, सोज्वळतेने आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल धन्यवाद. आशाताई, आम्ही तुम्हाला शब्दांपलीकडे मिस करू.
- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
-------
आशाताईंच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांचा आवाज भारतीय सिनेमाचा एक भक्कम आधारस्तंभ राहिला आहे आणि पुढील अनेक शतकांपर्यंत तो जगभर घुमत राहील. त्यांची प्रतिभा अनेकांना मागे टाकणारी आहे. त्यांनी मला नेहमी आशीर्वाद आणि प्रेम दिले. त्यांची उणीव मला कायम जाणवेल.
शांततेत विसावा घ्या, आशाताई खूप प्रेम.
-शाहरुख खान, अभिनेते
------
आशाताई (ज्यांना मी प्रेमाने ‘आई’ म्हणायचो) अशा व्यक्ती होत्या, की त्यांच्या सहवासातून दूर गेल्यानंतरही त्यांची ऊब कायम मनात राहायची. मला त्यांना अनेक वेळा भेटण्याचे भाग्य लाभले आणि प्रत्येक क्षण घरासारखा वाटायचा. त्या खूप दयाळू, सोज्वळ आणि शांत प्रेमाने भरलेल्या होत्या. माझ्यासाठी एक खास आठवण म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने माझा आवडता पदार्थ बनवून मला घरी बोलावले होते. त्यांच्या टेबलवर बसताना मला खूप सन्मानित आणि आपुलकीने भरलेले वाटले. माझ्यासाठी सर्वात खास म्हणजे त्यांचे अनपेक्षित फोन. जेव्हा जेव्हा त्यांना माझ्या कामात काही चांगले दिसायचे तेव्हा त्या फक्त प्रोत्साहन देण्यासाठी मला फोन करायच्या. आई, तुमच्या दयाळूपणासाठी आणि मला खास वाटू दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रेम आणि तुमचा आवाज मी नेहमी माझ्या मनात जपून ठेवेन. तुमच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो.
- रितेश देशमुख, अभिनेता
-------
काही आवाज फक्त गाणे गात नाहीत, ते आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. आशाताई त्यापैकीच एक होत्या. आपण सगळे आपल्या घरात, प्रवासात आणि शांत क्षणांत कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यासोबत वाढलो आहोत. आज ‘एका युगाचा अंत’ असे म्हणणेही कमीच वाटते.
- सुनील शेट्टी, अभिनेता
-------
आशाताई आता राहिल्या नाहीत! जी व्यक्ती इतकी चैतन्यमय होती, जिने आपल्या गाण्यांमध्ये जिवंतपणा आणि वैशिष्ट्य बहाल केले होते तीच आज आपल्याला शोकात लोटून गेली आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्यासाठी हे विशेष कठीण आहे. कारण आशाजींशी माझे एक भावनिक नाते जोडलेले आहे.
- हेमा मालिनी, अभिनेत्री
-------
तुमचा सुमधुर स्वर, तुमचा दयाळूपणा, शालीनता आणि मायेचा ओलावा सदैव जिवंत राहील. आशाजी, तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
- विकी कौशल, अभिनेता
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.