मुंबई

ओव्हरहेड वायर खंडित झाल्याने लोकल सेवा ठप्प

CD

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा विस्कळित

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : भाईंदर ते नायगावदरम्यान वसई खाडीपुलावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे जलद मार्गावरील विरारच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा रविवारी (ता. १२) सकाळी ठप्प झाली. यामुळे लोकळचे वेळापत्रक विस्कळित झाले होते.
सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान जलद मार्गावरील विरारच्या दिशेने जाणारी लोकल खाडीपुलावर आली असताना ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे लोकल पुलावरच थांबली. परिणामी, प्रवाशांना पायपीट करून पुन्हा भाईंदर स्थानक गाठावे लागले. यामुळे विरारच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. परिणामी, लोकलचे वेळापत्रक कोलमडून गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रविवार असल्यामुळे नोकरदारांची गर्दी कमी असली तरी कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांची चांगलीच गैरसोय झाली. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम संपल्यानंतर दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांनी जलद मार्गावरून लोकल विरारच्या दिशेने रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT