मुंबई

अंबरनाथमध्ये मटका जुगारावर कारवाई

CD

अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : पूर्व व पश्चिम परिसरात सुरू असलेल्या बेकायदा मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत ११ एप्रिलला सायंकाळी उदय हाउसिंग सोसायटीजवळील पत्र्याच्या शेड परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत अकिल अहमद शेख (६१), स्वप्नील शेलार (४२) आणि जनार्दन जोशी (७०) यांना मटका जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. हवालदार कैलास पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार वळवी करत आहेत. दरम्यान, अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाणे हद्दीत मोरेवली नाका, कामगार पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत दुसरी कारवाई करण्यात आली. या वेळी लक्ष्मण चंद्रन (३०) आणि गणेश मांजोतकर (३५) हे मटका जुगार खेळताना आढळून आले. पोलिस नाईक अनिस शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र अहिरे करत आहेत. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT