सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण-मलंगगड रोडवरील आडिवली-ढोकळी परिसरात घरखरेदीच्या प्रलोभनात पालघर जिल्ह्यातील एका महिलेची सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर संबंधित महिलेला हात-पाय तोडण्याच्या धमक्या दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कविता यादव (४१, रा. मनोर, पालघर) यांना आडिवली-ढोकळी परिसरात चाळीमध्ये खोली खरेदी करायची होती. ओळखीतील संतोष यादव, ब्रिजेश यादव, सुनील यादव, कृष्णा यादव आणि रणजीत सिंग यांनी त्या भागात बांधकाम सुरू असल्याचे सांगत खोली व गाळा विक्रीचे प्रलोभन दाखवले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने रोख व धनादेशाद्वारे एकूण पाच लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर खोलीचा ताबा देण्याबाबत टाळाटाळ सुरू झाली. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महिला पतीसह संबंधितांकडे गेली असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच, पुन्हा पैशांची मागणी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घराचा ताबा व पैसे दोन्ही न मिळाल्याने अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.