अपघातात एक महिला, दोन बैल ठार
पिकअपच्या धडकेत आठ जण जखमी; मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रकार
शहापूर, ता. १२ (वार्ताहर) : घोटी येथून वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बैलगाड्यांच्या ताफ्याला भरधाव पिकअपने धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून आठ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहनाची धडक इतकी जोरदार होती, की यात बैलगाडीला जुंपलेले दोन बैल जागीच ठार झाले. इतर चार बैल गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर कळमगावच्या हद्दीत शनिवारी (ता. ११) मध्यरात्री घडला. तर पिकअपचालक वाहन सोडून फरार झाला असून शहापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून वज्रेश्वरी येथील यात्रेला काही भक्तगण बैलगाडीमधून निघाले होते. आठ-नऊ बैलगाड्यांचा ताफा नाशिक-मुंबई महामार्गावरून रात्री चालला असताना शहापूर तालुक्यातील कलमगावच्या हद्यीत पाठीमागून येणाऱ्या पिकअप वाहनाने बैगाड्यांच्या ताफ्याला जोरदार धडक दिली. यामध्ये सुरेखा आडोळे (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. वैभव गिते, सचिन आडोळे, फुलचंद आडोळे, शुभम लहाने, देवीदास भगत, जनाबाई भगत, वैभव भगत व पिकअप वाहनामधील क्लिनर मांगीलाल असे आठ जण जखमी झाले. जखमी घोटी व परिसरातील असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मांगीलाल हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.