बेलापूर स्थानक परिसरात रात्री अनधिकृत धंदे
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत अनधिकृत धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. रात्री सुमारे साडेअकरा वाजल्यानंतर फुटपाथवर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे राहत असून, पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मुंबईप्रमाणेच आता नवी मुंबईतही उशिरापर्यंत चालणाऱ्या चहा, कॉफी, सिगारेट आणि लहान खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, या स्टॉल्सच्या आडून काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
स्थानकबाहेरील फुटपाथवर बुर्जी-पाव, चहा, सिगारेट, गुटखा आदींची विक्री करणारे अनेक स्टॉल उभे राहत असून, ते अधिकृत परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा या ठिकाणी तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गटागटाने उभे राहून गप्पा मारणे, काही ठिकाणी मद्यप्राशन किंवा नशेत असलेले व्यक्ती दिसून येत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
प्रशासनाचे दुर्लक्ष
मोठ्या प्रमाणात अनधिकृत धंदे सुरू असतानाही पालिका प्रशासन, अतिक्रमण विभाग आणि पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सीबीडी बेलापूर हा नवी मुंबईतील महत्त्वाचा प्रशासकीय आणि व्यावसायिक विभाग असल्याने, स्थानक परिसरातील रात्रीच्या अनधिकृत हालचालींवर तत्काळ नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मनोज डोंगरे यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.