सानपाड्यात कचरा संकलनासाठी लहान वाहनांची मागणी
सानपाडा, ता. १२ (वार्ताहर) : नवी मुंबईतील सानपाडा गावातील अरुंद रस्त्यांमुळे कचरा संकलनात अडचणी येत असल्याने तीन चाकी (छोट्या) कचरा संकलन वाहनांची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांना जनता दरबारात निवेदन देऊन ही मागणी केली.
वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सानपाडा गावातील अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे मोठी कचरा वाहने आत पोहोचू शकत नसल्याने कचरा संकलनात अडथळे निर्माण होत असून, स्वच्छतेच्या समस्या वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर लहान रस्त्यांमध्ये सहज फिरू शकतील अशा तीनचाकी वाहनांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होऊन नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.