डोंबिवली, ता. १२ : डोंबिवली पश्चिमेतील सत्यवान चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन चौघा जणांनी कारचालक व त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी प्रितेश ऊर्फ राम्या म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे यांच्यासह चौघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारत होते. त्यावेळी अमित पाटील हे कारने तेथे आले असता त्यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि वारंवार हॉर्न वाजवल्याने वाद चिघळला. संतापाच्या भरात आरोपींनी अमित आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे यांच्यावर दगडांनी बेदम मारहाण केली. तसेच कारची तोडफोड केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधमोहीम राबवत आरोपींना अटक केली. त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.