मुंबई

माथाडी कामगारांच्या स्वप्नाला आकार

CD

वाशी, ता. १२ (बातमीदार) : घणसोली परिसरात माथाडी कामगार वास्तव्यास असलेल्या सिडकोनिर्मित सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या सोसायट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी भगवती या बांधकाम व्यावसायिकाची बहुमताने निवड करण्यात आल्यानंतर रविवारी (ता. १२) सर्वसाधारण सभा सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली असून, बहुमताने हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती मिळली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून घणसोली सेक्टर सात येथील सिप्लेक्स संकुलातील सात रहिवासी गृहनिर्माण संस्थांमधील सोसायट्यांच्या इमारती मोडकळीस येऊ लागल्या आहेत. भिंतींना भेगा, गळती, सांडपाणी व पावसाळ्यातील पाण्याचा त्रास, तसेच विद्युत आणि पाणीपुरवठ्याच्या जुनाट यंत्रणांमुळे रहिवाशांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी संरचनात्मकदृष्ट्या इमारती धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने अपघाताची भीती कायम होती. या पार्श्वभूमीवर पुनर्विकासाची मागणी सातत्याने होत होती. काही दिवसांपूर्वी भगवती या बांधकाम व्यावसायिकांची बहुमताने निवड केली होती, तर घणसोली येथे माथाडी हाउसिंग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या श्री गणेशकृपा, कै. शिवाजीराव पाटील, कै. आमदार अण्णासाहेब पाटील, माऊलीकृपा, श्री गुरुदेव दत्त, श्री हनुमान आणि ओम साईधाम या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची रविवारी बैठक पार पडली. या वेळी पुनर्विकासाची प्रक्रिया पार पडली असून, बहुमताने ठराव पास झाला आहे. या निर्णयानंतर सभागृहात समाधानाची भावना पसरली.

पुनर्विकास प्रक्रियेतील ७९ अ अंतर्गत असणारी प्रक्रिया सिडकोच्या अधिकाऱ्यांसमवेत पार पडली असून, बहुमताने निर्णय मंजूर झाला आहे. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाला सीसी मिळण्याची शक्यता आहे. २६० चौरस फुटांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ५०७ चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
- संदीप लंटाबळे, अध्यक्ष, श्री गुरुदत्त सोसायटी

या ऐतिहासिक निर्णयामुळे घणसोलीतील माथाडी कामगारांच्या सिडकोनिर्मित सोसायट्यांच्या पुनर्विकासाला ठोस दिशा मिळाली असून, येत्या काळात आधुनिक, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न गृहनिर्माण प्रकल्प साकार होणार आहे.
- आबासाहेब शेडगे, अण्णासाहेब पाटील सोसायटी

दुप्पट आकाराचे घर
सिप्लेक्स गृहनिर्माण सोसायटीमध्ये २६० चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवांशांना आता ५०७ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया पार पडून सीसी मिळण्याची शक्यता आहे. २०३० मध्ये रहिवाशांना घरे मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT