मुंबई

खारघरवासीयांच्या विरंगुळ्याची जागा उद्ध्वस्त

CD

उद्यान मालिका भाग - १

खारघरवासीयांच्या विरंगुळ्याची जागा उद्ध्वस्त

सेक्टर २०-२१ मधील उद्यानांची दुरवस्था कायम

खारघर, ता. १२ (बातमीदार) : उद्यानांचे शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेत आता लोकप्रतिनिधी बसत असल्याने विरंगुळ्याचे क्षण असणारी हे उद्याने पुन्हा हिरवीगार, मुलांसाठी खेळणी, तसेच अन्य देखरेख ठेवण्याची गरज आहे. खारघरमधील सेक्टर २० आणि २१ परिसरातील उद्यान निवासी भागात असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, उद्यानात पुरेशा प्रमाणात विजेचे दिवे नसल्यामुळे सायंकाळनंतर परिसर अंधारात जात असून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत उद्यान अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सिडकोने खारघर परिसरात सेक्टरनिहाय उद्याने आणि मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, पालिकेने सेक्टर २१ मधील भूखंड क्रमांक १३ मध्ये उभारलेल्या उद्यानातील काही खेळणी मोडकळीस आली आहेत. उद्यानाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे हिरवळ नाहीशी झाली आहे. पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. खेळणी असलेल्या जागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले, तर उद्यान आणि ओपन जिम परिसरात अस्वच्छता पसरली आहे. उद्यानाच्या एका बाजूला मोडकळीस आलेल्या खेळणीचा ढीग साचला आहे. तसेच शिल्प चौकशेजारील उद्यानात फरशी मोडकळीस आली असून, पुरेशा प्रमाणात विजेचे दिवे नसल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या आहेत.

सेक्टर २० मधील भूखंड क्र. २१ मधील उद्यानात पालिकेने लहान मुलांसाठी खेळणी, नागरिकांसाठी ओपन जिम उभारली आहे. मात्र, उद्यानातील चिल्ड्रन पार्क परिसरात पुरेशा प्रमाणात विजेचे दिवे नाहीत. शिवाय खेळणीच्या शेजारी लाकडाचे ढिगारे पडून आहे. उद्यानातील ई-टॉयलेटमध्ये बहुतांश वेळा पुरेसे पाणी नसल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उद्यानात अनेक ठिकाणी दिवे बंद अवस्थेत आहेत किंवा अपुरे आहेत. त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी फिरणे टाळावे लागते.

काही ठिकाणी बाकांचीही कमतरता असून, उपलब्ध बाके जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना बसण्यासाठी योग्य सोय नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक नंदकुमार काळे म्हणाले की, उद्यानात बसण्यासाठी बाकडे नाही. पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उद्यानातील दिवे दुरुस्त करावे, तसेच नवीन बाके बसवून समस्या दूर करावी.

सेक्टर २१ मधील उद्यानातील काही खेळणी मोडकळीस आली आहेत. ओपन जिममध्ये नागरिक कसरतीसाठी येतात, मात्र साहित्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. तसेच उद्यान स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
- त्र्यंबक यादव, रहिवासी, सेक्टर २१, खारघर

सेक्टर २० मधील उद्यानात पुरेसा दिवे नसल्यामुळे अंधार असतो. झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक आहे. तसेच ई-टॉयलेटमध्ये पुरेसे पाणी नसते. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उद्यानातील समस्या दूर करावी.
- दीपक घरत, रहिवासी, सेक्टर २०, खारघर

खारघरमधील उद्यानांसंदर्भात स्थानिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उद्यानाची निगा राखणे आवश्यक आहे. यासंदर्भात लवकरच उद्यान अधिकारी यांची भेट घेऊन उद्यानातील समस्या दूर करावी, अशी मागणी करणार आहे.
- मधु पाटील, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT