उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरात अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना व युवासेना यांच्या पुढाकाराने बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे टॅटू मोफत काढून देण्यात आले.
शिवसेना नगरसेविका कांता पवार, युवासेना शहर अध्यक्ष सुशील पवार आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली लालचक्की चौक येथील युवासेना शहर कार्यालयात हा उपक्रम पार पडला. समता, स्वाभिमान आणि संविधानाच्या विचारांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो युवकांनी हातावर बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे टॅटू काढून घेत समतेची शपथ घेतली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवम् साळवे, राहुल जाजवात, तुषार मोरे, विकी बनसोडे, शेखर सपकाळे, गौरव भानुशाली आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.