मुंबई

अलिबागमधील गोविंद बंदर येथे स्वच्छता अभियान

CD

अलिबागमधील गोविंद बंदर येथे स्वच्छता अभियान
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील गोविंद बंदर परिसरात विशेष दलितवस्ती स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. हे स्वच्छता अभियान सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, यामध्ये शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले.
या मोहिमेत समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, समतादूत, अलिबाग नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्र येत परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून वस्तीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर केला. केवळ स्वच्छताच नव्हे, तर या माध्यमातून सामाजिक एकतेचा आणि स्वच्छ आरोग्याचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्यासाठी सामाजिक समता आणि स्वच्छता या दोन गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत, यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. संविधानाने दिलेल्या मूल्यांची जोपासना करत असतानाच आपल्या परिसराचे आरोग्य राखणे, हीदेखील एक प्रकारे राष्ट्रसेवाच असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT