मुंबई

आशा भोसले मान्यवर श्रद्धांजली

CD

आशा भोसले मान्यवर श्रद्धांजली
--------
आशा भोसले यांचं निधन हे केवळ एका सहकाऱ्याचं नव्हे, तर जिवलग मैत्रीण आणि उत्कृष्ट कथाकथनकार गमावल्यासारखं आहे. त्यांच्या गाण्यांत खोडकरपणा, मस्ती आणि ऊर्जा ओसंडून वाहते. त्यांच्या आवाजात तरुणाई, आकर्षकता आणि एक वेगळीच जादू आहे. त्या उत्तम कथाकथनकार होत्या आणि त्यांचा विनोदबुद्धी खूपच खट्याळ होता. मी त्यांच्या हातची पुरणपोळी खाल्ली आहे, पण त्यांना त्यांच्या कबाबांचा विशेष अभिमान होता. लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गज बहिणीसोबत वाढूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात अनेक नवोदित गायक लतादीदींची नक्कल करायचे, पण त्यांच्या धाकट्या बहिणीने स्वतःचा वेगळा मार्ग आणि शैली तयार केली. आज आशा भोसले त्यांच्या खास शैलीसाठी ओळखल्या जातात. एका मुलाखतीत लतादीदी म्हणाल्या होत्या; ‘आशा माझी सर्व गाणी गाऊ शकते, पण मी तिची सर्व गाणी गाऊ शकत नाही.’ हा फार मोठा सन्मान होता.
-जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार
--------
आशा भोसले यांचे उबदार व्यक्तिमत्त्व, त्यांची खोडकर शैली आणि त्यांच्या हातचे प्रसिद्ध कबाब या सगळ्या आठवणी त्यांना ओळखणाऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील. आशा भोसले उत्तम स्वयंपाकी होत्या. आम्ही अनेकदा त्यांच्या घरी जेवायला जायचो किंवा त्या आमच्याकडे यायच्या. त्या स्वतः स्वयंपाक करायच्या आणि अप्रतिम करायच्या. अख्तर आणि भोसले यांच्यातील गमतीशीर संवाद ऐकण्यात त्यांना विशेष आनंद मिळायचा. कोविडच्या काळात आम्ही खूप जवळ आलो. आम्ही खंडाळ्यात होतो आणि त्या लोणावळ्यात कुटुंबासोबत. त्या आमच्यासाठी अतिशय चविष्ट जेवण बनवायच्या आणि जावेद व त्या दोघे मिळून इंडस्ट्रीतील मजेदार किस्से सांगून आम्हाला हसवायचे. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती आणि त्या अगदी स्पष्टवक्त्या होत्या.
-शबाना आझमी, ज्येष्ठ अभिनेत्री
--------
आशाताईंनी आपल्याला सोडून दिलं असलं, तरी आपण त्यांना कधीच सोडू शकत नाही. भारतातील एक आयकॉनिक गायिका, आशा भोसले या खऱ्या अर्थाने एक अनमोल रत्न होत्या. त्यांच्या विलक्षण बहुपैलू आवाजामुळे त्या भारतीय संगीताच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील. ही माझ्यासाठी वैयक्तिक हानीदेखील आहे, कारण त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला नेहमीच आपलं विशेष प्रेम आणि आशीर्वाद दिले. ९२ व्या वर्षी त्यांनी अत्यंत शांत आणि सन्मानाने जगाचा निरोप घेतला, पण आपल्या आणि पुढील पिढ्यांसाठी त्यांनी गाण्यांचा अमूल्य खजिना मागे ठेवला आहे.
- सुभाष घई, ज्येष्ठ दिग्दर्शक
--------
एका सुवर्णयुगाचा आज अंत झाला आहे. आशाजींबद्दल ‘त्या होत्या’ असं भूतकाळात बोलणंही मनाला पटत नाहीये. आमची रोज भेट किंवा बोलणं व्हायचं असं नाही, पण जेव्हा कधी मी मुंबईत असायचे आणि प्रभू कुंजवरून जायचे, तेव्हा आधी लतादीदींना फोन करायचे आणि त्यांच्या निधनानंतर आशाजींशी संपर्क करू लागले. माझ्यासाठी हे नातं नेहमीच आदराचं राहिलं आहे. त्यांच्यासारखी गायिका पुन्हा होणे शक्य नाही. त्यांची गाण्याची पद्धत आणि शब्दांचे उच्चार अप्रतिम होते. आजच्या पिढीतील तरुण गायक-गायिकांसाठी त्या एक मोठी प्रेरणा आहेत.
-उषा उत्थुप, ज्येष्ठ गायिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT