मुंबई

थोडक्यात

CD

थोडक्यात

पेणमध्ये रक्तदान शिबिर
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून रक्तदान शिबिर पार पडले. उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी प्रतिसाद देत रक्तदान केले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांचे जीव वाचवणे हे कर्तव्य समजून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर, पेण तालुका उपाध्यक्ष पंकज पाटील, श्रीराम पाटील, प्रसाद पाटील, नितेश पाटील, सौरभ पाटील, महिला अध्यक्षा गौरी पाटील व्होरा आदींसह विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
---------------------------------------------
उन्हामुळे शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी
पेण (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह राज्यात वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले असून, पेण शहरातील शीतपेयांच्या दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सकाळीच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नागरिकांनी लिंबू सरबत, ज्युस, लस्सी, ताक आणि उसाचा रस यांसारख्या थंड पेयांकडे मोर्चा वळवला आहे. हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसानंतर आता कडक उन्हाचा फटका बसू लागला आहे. बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणारे नागरिक थंड पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेय खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान, लिंबाच्या किमतीतही वाढ झाली असून, लहान लिंबू पाच रुपये तर मोठे लिंबू सात ते आठ रुपयांना विकले जात आहेत. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक शीतपेयांचा आस्वाद घेत आहेत.
----------------------------------------------------
सुमित्र पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खलील तांडेल
रेवदंडा (बातमीदार) : सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खलील तांडेल यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी हेमांगी साखळे यांची निवड झाली आहे. गुरुवारी (ता. ९) पतसंस्थेच्या कार्यालयात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे प्राधिकृत अधिकारी चेतन पेटकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यापूर्वी खलील तांडेल हे उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. विद्यमान अध्यक्ष कमळाकर साखळे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागी तांडेल यांची निवड करण्यात आली. त्यांच्या जागी उपाध्यक्षपदी हेमांगी साखळे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT