मुंबई

वसईत रंगला ''साहित्य जल्लोष''; काव्यधारेत रसिक चिंब

CD

वसईत रंगला‘साहित्य जल्लोष’
कवितांच्या सादरीकरणाला वसईकरांची दाद
विरार, ता. १३ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिका, ज्ञानदीप मंडळाचे सेंट जोसेफ महाविद्यालय सत्पाळा आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वसईत कविसंमेलनातून मराठी साहित्याचा अभूतपूर्व उत्सव साजरा केला. या वेळी दिग्गजांच्या उपस्थितीत ३५ कवींच्या विविध रचनांनी वसईकर मंत्रमुग्ध झाले.
शब्दांचे जादूगार हास्यसम्राट अशोक नायगावकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. नायगावकरांनी मिश्कील शैलीत ‘भाज्यांची कत्तल’ ही कविता सादरीकरणातून मनोरंजन केले, तर अरुण म्हात्रे यांच्या शब्दांनी रसिकांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी वसई-विरार पालिकेचे महापौर अजीव पाटील आयुक्त, उपायुक्तांसह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना मान्यवरांची कवितेला मिळालेली उत्स्फूर्त दादमधून कार्यक्रमाची सांगता झाली.
------------------------------
३५ कवींचा सहभाग
ज्येष्ठ कवींसोबतच महाविद्यालयीन कवींनी प्रतिभा सिद्ध केली. यामध्ये मेलसेना तुस्कानो, स्वाती भोईर, संगीता पाटील, रेबेका दोडती, प्रकाश पाटील, अमोल नाईक, संगीता अरबुने, ज्योती राव, शुभम पाटील, विशाखा गाळवणकर, स्नेहा पंडीत, फ्रेक मिरांडा, अनघा खरात, रोहन रत्ने, समर सावंत, सौरभ पाटील, प्रशांत पाटील, डाॅ सुरेखा धनावडे, सीमा पाटील, जगदीश संसारे, मंजुषा गवई यांच्यासह ३५ कवींनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT