स्थायी समिती सदस्य निवडीला मुहूर्त
भिवंडी पालिकेच्या उद्याच्या महासभेत होणार निर्णय
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) ः तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीसाठी १६ सदस्य निवडण्यात येणार आहेत.
पक्षीय बलाबल लक्षात घेता काँग्रेस पाच, भाजप चार, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) दोन, शिवसेना दोन, समाजवादी पार्टी, कोणार्क विकास आघाडी व भिवंडी विकास आघाडी प्रत्येकी एक असे सदस्य असणार आहेत. त्यासोबत या महासभेत विषय पत्रिकेवर पाच प्रभाग समितींच्या प्रभागांचे सीमांकन जाहीर करणे व महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाच्या पालिकेस सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या करारास मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे.
काँग्रेसचे कोण सदस्य असणार, हे सर्वस्वी समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या हाती असून, त्यांच्या समर्थकांची वर्णी सदस्यपदी लागू शकते, तर सेक्युलर फ्रंटमधील सत्तेचे वाटेकरी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) यांच्या वाट्याला सभापती पद जाणार आहे.परंतु त्यांच्याकडून बहुमताचा आकडा कसा गाठला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवे राजकीय समीकरण?
स्थायी समितीमधील संख्याबळ पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) यांच्या सेक्युलर फ्रंटकडे अवघे सात संख्याबळ होत असून, स्थायी समिती सभापतिपदाच्या बहुमतासाठी नऊ सदस्यसंख्या लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये नवे राजकीय समीकरण पाहायला मिळते का, की पुन्हा भाजपमध्ये बंडखोरी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.