मुंबई

फॉरेक्स ट्रेडिंग च्या नावाखाली मित्रांना घातला २३ लाखांचा गंडा,

CD

दामदुप्पट परताव्याचे प्रलोभन महागात
फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली चौघांना २३ लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : फॉरेक्स ट्रेडिंगच्या व्यवसायात पैसे गुंतवल्यास दामदुप्पट परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एका तरुणाने तुर्भे नाका परिसरातील चौघांना २३ लाख १४ हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणातील आरोपी फरारी असून, तुर्भे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तुर्भे नाका परिसरातील हनुमान नगर येथे राहणारा साईराज जाधव (२८) याची समीर जावेद शेख सोबत ओळख होती. दोघेही एकाच व्यायामशाळेत जात असल्याने त्यांची मैत्री होती. समीरने फॉरेक्स ट्रेडिंगमधून मोठा नफा कमवत असल्याचे सांगून परिसरातील त्याच्या मित्रांकडून दुप्पट पैसे देण्याचे प्रलोभन दाखवून उधारीवर पैसे घेतले होते. तसेच त्याबदल्यात अधिकची रक्कम देऊन त्यांचा विश्वासही संपादन केला होता. या प्रकरणात साईराज जाधवसह त्याच्या मित्रांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
घरातून पलायन
साईराज जाधवने स्वत:सह आई, पत्नी, भावाच्या खात्यातून रोख स्वरूपात सात लाख रुपये समीरला दिले, तर त्याचे इतर मित्र करण जाधव साडेचार लाख, सुधीर जाधवकडून साडेसहा लाख, विकी मेढकरने पाच लाखांची रक्कम दिली होती, पण पैसे घेतल्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. तसेच ८ जानेवारी २०२६ रोजी मोबाईल फोन बंद करून घरातून पलायन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT