रीलच्या नादात मृत्यूशी गाठ
काळ मांडवी धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू
जव्हार, ता. १३ (बातमीदार)ः सोशल मीडियावरील आकर्षक रीलच्या नादात १७ ते १८ वयोगटातील तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. काळ मांडवी धबधब्यावर शनिवारी ही घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी काळ मांडवी धबधब्याची रील नयन सिंगचा मित्र चंदन यादवने पाहिली होती. या रीलमध्ये दिसणारे आकर्षक दृश्य पाहून प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देण्यासाठी नयन त्याच्या तीन मित्रांसह दुपारी ४च्या सुमारास धबधब्यावर आला होता. पोहता येत नसल्याने त्याचे दोन मित्र कमी खोलीच्या पाण्यात अंघोळ करत होते. याचदरम्यान, नयन अचानक दिसेनासा झाला. त्याच्या मित्रांनी ग्रामस्थांसह तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, काही वेळाने डोहात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने जव्हार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
--------------------
सूचनांकडे दुर्लक्ष
सध्या सोशल मीडियावर पर्यटनस्थळांच्या आकर्षक रील्स मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या जात आहेत. मात्र, त्या ठिकाणांवरील संभाव्य धोके दाखवले जात नसल्याने तरुण बेफिकीरपणे अशा ठिकाणी जात आहेत. पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे तरुणांनी पर्यटनस्थळी जाताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस तथा सामान्य प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.