मुंबई

७/१२ चा सर्व्हर डाऊन ! कामे खोळंबली

CD

सातबाऱ्यामुळे कामांचा खोळंबा
जव्हार तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय
जव्हार, ता. १३ (बातमीदार)ः राज्य तथा केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून मिळणारा लाभ शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे. मात्र, चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
शेतकऱ्यांना विविध कामांसाठी सातबाराची गरज असते. यासाठी वारंवार तलाठी कार्यालयाची पायपीट करावी लागू नये याकरिता शासनाने ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सेतू सुविधा, महा ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्रावरून सातबारा काढणे सोपे झाले. मात्र, चार दिवसांपासून ऑनलाइन सातबारा काढण्याचे सर्व्हर डाऊन असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्व्हर नेमके कशामुळे बंद आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, प्रकारामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
------------------------------
खरिपाचे नियोजन बिघडले
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात तालुक्यातील शेतकरी व्यस्त आहे. खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीककर्ज, अनुदानावर बियाण्यांची उचल करण्यासह इतर कामासाठी सातबाराची गरज आहे. सातबारा शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन मिळत असल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले होते.
---------------------------------
शिक्षणाकामी कागदपत्र काढण्यासाठी सातबारा दाखला काढणे गरजेचे आहे. त्यानुसार कागदपत्र काढण्यासाठी जव्हारला फेऱ्या मारत आहे. मात्र, काहीतरी समस्या येत असल्याने मला प्रमाणपत्र मिळत नाही.
- अलका पारधी, मोहपाडा, जव्हार
-------------------------
तांत्रिक बाबी वापरत यंदा शेती करण्याचा मानस केला आहे. त्यासाठी विविध अनुदान मिळणार आहे. मात्र, काही दिवसांपासून सातबारा प्रमाणपत्र मिळत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
-शैला पारधी, आकरे
------------------------
ऑनलाइन सातबारा निघण्यात अडचणी येत आहेत. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.
- लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT