मुंबई

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

CD

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा
खालापूर बस स्थानक परिसरात प्रवाशांना मनस्ताप
खालापूर, ता. १३ (बातमीदार): खालापूर शहरातील बस स्थानक परिसरात चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर उभी करून ठेवण्याचे प्रकार वाढल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बस स्थानक परिसर हा कायम वर्दळीचा असून, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे आणि भूमी अभिलेख कार्यालय असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. कामानिमित्त येणारे अनेक वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून निघून जातात. परिणामी, बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसना वळण घेताना अडथळा निर्माण होतो.
अनेकदा संबंधित वाहनचालक जागेवर नसल्याने एसटीचालकांना बस मागे-पुढे करत कसरत करून बाहेर काढावी लागते. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

चौकट :
उपाययोजना अपुऱ्या
मध्यंतरी नगर पंचायतीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन कर्मचारी नेमले होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या क्षमा आठवले यांनीही स्वतः पुढाकार घेत वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या उपाययोजना अपुऱ्या ठरल्याने समस्या कायम आहे. काही एसटीचालकांनी अडचणीमुळे शहरात बस न आणण्याचा पर्याय निवडल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

कोट :
सध्या नगर पंचायतीने एक कर्मचारी नेमला असून, तो न्यायालय परिसरातील वाहतूक नियंत्रित करतो. बस स्थानक परिसरातही लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच एसटी वळणाच्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात येईल.
- रोशना मोडवे, नगराध्यक्षा, खालापूर नगर पंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT