मुंबई

विकासकामांचे दोन वेळा शुभारंभ

CD

विकासकामांचा दोन वेळा शुभारंभ
श्रेयवादाच्या लढाईत नागरिकांचे मात्र हाल

विरार, ता. १३ (बातमीदार) : नायगाव पूर्वेकडील भोयदा पाडा ते नायगाव रस्ता गेल्या नऊ वर्षांपसून दुरुस्तीविना पडून होता, परंतु विधानसभेत झालेले सत्ता परिवर्तन आणि त्यानंतर महापालिकेत पुन्हा सत्तेवर आलेल्या बहुजन विकास आघाडीत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. या श्रेयवादामुळे या कामाचा एकाच दिवशी दोन वेळा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे श्रेयवादाच्या या लढाईत हा रस्ता आता तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.
भोयदापाडा ते राजावली आणि राजावली ते नायगाव पूर्व येथील रस्ता मजबुतीकरण व आर.सी.सी. पाइप गटार बांधकामाचा शुभारंभ वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते सोमवारी (ता. १३) करण्यात आला. वसई-विरार महापालिका, प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या भोयदापाडा-राजावली-नायगाव पूर्व (वामन ढाबापर्यंत) या महत्त्वपूर्ण मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गाचे मजबुतीकरण आणि रस्याच्या कडेला आर.सी.सी. पाइप गटार बांधकाम करण्याची मागणी करून त्याचा सतत पाठपुरावा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महापालिकेकडे केला होता. त्यामुळे भाजपने या रस्त्याच्या व गटाराच्या कामाचा शुभारंभ आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी केला. याप्रसंगी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच धर्मेंद्र कुलकर्णी, धनंजय मोहिते, राजू पाटील, दिवाकर सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.
याच कामाचा पाठपुरावा प्रभागसमिती माजी सभापती बहुजन विकास आघाडीचे आताचे नगरसेवक कन्हैया भोईर यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने आताच्या महासभेत या कामाला मंजुरी देण्यात आल्याचे सांगत दुपारी महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी या कार्यक्रमाला कन्हैया भोईर, नगरसेवक सुनील आचोलकर, नगरसेविका ज्योत्स्ना भगली व नगरसेविका दीपा पाटील उपस्थित होत्या. हे काम महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही या वेळी महापौर अजीव पाटील यांनी दिली. भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या या श्रेयवादाच्या लढाईत आता तरी हा रस्ता पूर्ण होईल का, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT